आपणच आपला धरावा नेहेमी हात !
आपण गावी आपलीच गाणी ...
ओठी कुणाची नको कहाणी !
आपणच वाहावे बनून वारा ...
आपल्या आपल्या वाटेसाठी तारा !
आपली वाट आपण चालावी ...
आपलीच आपण दिशा धरावी !
आपल्याच चित्रावर आपलेच रंग ...
आपल्या ढगांना आपलेच ढंग !
आपल्याला आपलीच काढावी नक्षी ...
आपणच झाड त्यावर आपणच पक्षी !
1 comment:
ब्लॉग ची सुरुवात दणक्यात आहे !
Post a Comment