Wednesday, September 14

आपणच ...

आपणच आपली करावी लागते साथ ...
आपणच आपला धरावा नेहेमी हात !

आपण गावी आपलीच गाणी ...
ओठी कुणाची नको कहाणी !

आपणच वाहावे बनून वारा ...
आपल्या आपल्या वाटेसाठी तारा !

आपली वाट आपण चालावी ...
आपलीच आपण दिशा धरावी ! 

आपल्याच चित्रावर आपलेच रंग ...
आपल्या ढगांना आपलेच ढंग !

आपल्याला आपलीच काढावी नक्षी ...
आपणच झाड त्यावर आपणच पक्षी !

1 comment:

arundhati said...

ब्लॉग ची सुरुवात दणक्यात आहे !