Monday, September 19

फस्त मनोरंजन !


सासू सुनेच्या भांडणात
तुम्ही बसता घालून नाक ..
आणि कोणीतरी आपले
साबण तुमच्या गळ्यात बांधत असतं !

गाण्याच्या स्पर्धेत तुम्ही
कोणालातरी म्हणता वाहवा ...
आणि कोणीतरी आपले
सिम-कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये खोचत असतं !

रात्री गुन्ह्याच्या किंवा भुताच्या शोधात
आपण सोफा पकडून बसतो
तेव्हा कोणीतरी आपल्याला कॉफीची तल्लफ देऊन जातं !

रिमोट कंट्रोलच्या एकेका बटणामागे
कोणी ना कोणी
आणखी एक रिमोट कंट्रोल घेऊन !

त्याच्या तालावर आपण ...
सिगारेट, दारू, साबण, शाम्पू, गाडी, शेअर्स, घरं...
कंडोम, सैनिटरी नापकिंस, अंतर्वस्त्र, डायपर्स ...
काय काय आणि किती किती फस्त करतो आहोत ...

आणि

आपण यालाच मनोरंजन म्हणत आहोत !

No comments: