Thursday, September 1

एक .. एक .. आणि एक ..


गणपती नावाचा एक देव आहे
गणपती नावाचा एक सण आहे 
आणि 
गणपती नावाचं एक निमित्त आहे !

मराठी नावाची एक भाषा आहे
मराठी नावाचा एक समाज आहे
आणि
मराठी नावाचा एक मुद्दा आहे !

क्रिकेट नावाचा एक खेळ आहे
क्रिकेट नावाचा एक किडा आहे
आणि
क्रिकेट नावाचा एक धंदा आहे !

भ्रष्टाचार नावाची एक पद्धत आहे
भ्रष्टाचार नावाचा एक विकार आहे
आणि
भ्रष्टाचार नावाचा एक विचार आहे !

उत्सव नावाचा एक उत्साह आहे
उत्सव नावाची एक रूढी आहे
आणि
उत्सव नावाचं एक काहीही आहे !

साई नावाचा एक संत आहे 
साई नावाचा आणखी एकजण होता
आणि
साई नावाचा बिअर बार आहे !

अमुक नावाची एक जात आहे
तमुक नावाची जमात आहे
आणि
माणूस नावाचा एक पशू आहे !

टीव्ही नावाचं एक यंत्र आहे
टीव्ही नावाचा एक खोका आहे
आणि
टीव्ही नावाचा एक बोका आहे !

मंत्री नावाची एक खुर्ची आहे
मंत्री नावाचं एक पद आहे
आणि
मंत्री नावाचं एक लायसन्स आहे !

१०
पोलीस नावाची एक नोकरी आहे
पोलीस नावाचा एक व्यवसाय आहे 
आणि 
पोलीस नावाचा एक गणवेश आहे !

No comments: