Tuesday, July 28

।। ढोबळा भोंडला ।।एक ढोबळ झेलू चला
दोन ढोबळ झेलू
दोन नंतर तीन नंतर
चार ढोबळ झेलू
चार ढोबळ पांच ढोबळ 
सगळे ढोबळ झेलू
(चाल)
ढोबळ ढोबळ खेळू चला, खेळू चला
ढोबळ ढोबळ मिळू चला, मिळू चला ||
(चाल)
ढोबळ गाणी ढोबळ नाच
ढोबळ पुस्तक ढोबळच वाच
ढोबळ शिकवू धडे-धडे
ढोबळ करियरला साकडे
(चाल)
सिनेमे ढोबळ करू गडे, करू गडे
नाटक सिरियल सगळीकडे, सगळीकडे
(चाल)
जिकडे तिकडे चोहिकडे
ढोबळतेचे घालू सडे 
(चाल)
पाठही थोपटू ढोबळ, ढोबळ
रियाक्ट होऊ ढोबळ, ढोबळ
आनंद मिळवू ढोबळ, ढोबळ
जगणं जगूया ढोबळ, ढोबळ
(चाल)
ढोबळपणाची बळकट घोडी
येता जाता तंगडे घाली
तंगड्याखाली चिरडलं काय?
कशाला शोधू? चिरडत जाय!
(चाल)
वारसा शोधू ढोबळ, ढोबळ
इतिहास लिहू ढोबळ, ढोबळ
(चाल)
येता जाता अन् बसता
ढोबळ ढोबळ काय म्हणता ?
त्यातच खेळे सब जन्ता
झाला असला की गुंता
(चाल)
गुंतू सारे ढोबळ, ढोबळ
सुटून जाऊ ढोबळ, ढोबळ
(चाल)
ढोबळ असणं सुरेख बाबा - सोयीचं पडतं !
ढोबळ बघणं सुरेख बाबा - पटकन आटपतं !
ढोबळ व्हावं ढोबळ बाबा - तत्काळ जमतं !
ढोबळ सगळं राहू द्यावं - लग्गेच सरतं !
(चाल)
ढब्बू ढब्बू ढोबळ
ढब्बूपणाचं कडबोळं
कडबोळं कठीण दाताला
आमचा भोंडला जन्माला !!
- प्रदीप वैद्य

No comments: