Monday, March 2

प्रार्थना

तुला तुझ्याच संपत्तीचा शेंबूडही येवोत भला
मला तुझा एखादा धनाढ्य जंतूही न मिळो!

भले तुला सापडोत
तुझ्याच रक्तात धनाढ्यतेच्या गुठळ्या
मला नको आहे आटायला तुझ्या रक्ताचा
थेंबही कधी माझ्यासाठी !

तुझ्या तिजोऱ्यांचे इमल्यांवर इमले चढोत अगदी आकाशापर्यंत
मला स्मारक म्हणून एखादा दगडही नको आहे

तू करीतच राहा तुझ्या सोन्याने बरबटलेल्या ढुंगणाचेही प्रदर्शन
मला तुझ्या अशा कशाचेच काहीच वाटू नये ही प्रार्थना करू दे !

No comments: