Wednesday, January 14

दर्या !

वरती-खाली श्वासांच्या लाटांचा - दर्या मी !
इथल्या आल्यागेल्याच्या भासांचा - दर्या मी !

नुरले वाऱ्यांच्या वेडांचे माझे - किनारे ..
हसणाऱ्या डोळ्यांमागे पाण्याचा - दर्या मी !

विझलेल्या ताऱ्यांची गाणी गावी दिशांनी
बुडतानाही गाणाऱ्या सूर्यांचा - दर्या मी  !

गगनाच्या आर्ताचे कोडे ठावे कुणाला ?
गगनाखाली आईना काळाचा - दर्या मी !

भरती ओहोटी माझी, ना साधी कहाणी
जगण्याच्या संमोही आवेगांचा - दर्या मी

No comments: