फ्रान्समधील चार्ली हेब्दो च्या कार्यालयावर जो दहशतवादी हल्ला झाला त्यावर प्रतिक्रीया म्हणून विविध व्यंगचित्रकारांनी २३ व्यंगचित्रं ताबडतोब प्रसिध्द केली. त्यातलं एक व्यंगचित्र पाहून मला काही सुचू लागलं ... ह्या घडनेचा तीव्र निषेध मनात दाटला होताच ... जे सुचलं ते आणि लगोलग खाली ज्या चित्रावरून ते सुचलं ते इथे देत आहे ... त्या चित्रानंतर खाली त्या तेवीस व्यंगचित्रांची मालिकाही जोडतो आहे ....
लेखणी
माणसाने माणसाला मारणे, हा
धर्म होऊ पाहतो !
कोण काही बोलता, कोणी त्वरेने
शस्त्र घेऊ पाहतो !
मारणे, हा भेकडांचा कायदा ही
खंत काळाची जुनी
भेकडांचा म्होरक्या, साऱ्या जगाचा
संत होऊ पाहतो !
ह्या विचारांच्या मशाली, शोधती की
दंभ, सारी शोषणे
शोषणारा, घाबरोनी आज खोटा
सूर्य होऊ पाहतो !
लेखणी जे मांडते, ते, मात्र
काही शब्द, काही सांगणे !
लेखणीेने सांगणारा, हाय केव्हा
रक्त घेऊ पाहतो ?
लेखणी कापाच माझी, दोन झाल्या
लेखण्या त्याच्यातुनी
मीच आता दोन ताज्या लेखण्यांचा
जन्म घेऊ पाहतो !
No comments:
Post a Comment