आज मला माझ्याच पूर्वी केलेल्या कवितेची खूप आठवण झाली ....ती अशी ... (पुढे काही सुचलंय ते ही देतोय इथे त्या कवितेसोबत ... )
युरोप किंवा अमेरिकेतल्या
जिवंत किंवा मृत अशा
कोणत्याही नामी कलाकार, विचारवंताशी
सरळ
किंवा बादरायण संबंधाने
नाही जोडून घेता येत
मला माझं नांव
किंवा
नाही लावता येत
मला माझ्या बेंबीवर
कुठल्याही इझमचा
शिक्का असलेला बिल्ला
नाळेसारखा रूबाबात
मिरवण्यासाठी !
कुत्र्यांची सांगता येते
तशासारखा
कोणत्याही पेडिग्रीचा मी
नसल्याने
मला म्हटले पाहिजे
स्ट्रे कलाकार !
आपण सगळेच
जे जे
बिनदिक्कत जगतो, बोलतो, वागतो
त्याची एक
डेकोरेटेड ओकारी
तुम्हाला कसला तरी कॉम्प्लेक्स देत
तुमच्याच अंगावर ओकण्यासाठी
कुणा पाश्चात्य विचारवंताची
लाळ माझ्या लेखणीत
आणि तोंडात मी भरून
घेऊ शकत नाही
असा मी
भटका कुत्रा !
No comments:
Post a Comment