जिंकण्यासाठीच वेड्या आंधळे बहिरे असावे लागते !
स्वार्थ आणिक सोय यांनी ऐकणे बघणे फसावे लागते !
भास पोकळ साधणे परमार्थ किंवा फेडणे उपकारही ..
आतला आवाज येता भावना गिळूनी बसावे लागते !
काय आले ? काय उरले ? तेवढी गणिते खरी मानायची
भंगलेले गंजलेले बाजुला करुनी हसावे लागते !
जिंकताही आणखी जिंकायचे अन् सारखे चालायचे
हारणारे पान येता सारखे फिरुनी पिसावे लागते !
हारता जातो कुठे मी ? जिंकणे असते किती, सरते कुठे ?
जिंकलो मी जिंकलो मी सारखे म्हणता दिसावे लागते !
No comments:
Post a Comment