Tuesday, November 5

रोषणाई


घोर काळोखदेही रात आहे
रोषणाई उभ्या गांवात आहे
तोरणे दीपकांची जेथ तेथे
तारकांच्या वरी ही मात आहे
हाय जो तो कसा उजळून गेला
तेज कोणामधे हृदयात आहे ?
देव शोधायचा कोणात आता ?
इच्छुकांची घरी रूजवात आहे
एक हुंकार आहे दाटलेला
एक मी तेवणारी वात आहे

No comments: