व्यथा माझी कथा माझी
तुझ्या बाहूंत संपावी
फुले काही कळ्या काही
चिता माझी सुगंधावी ...
तुझे आकाश ता-यांनी
असे बहरून आलेले
पुन्हा ही कोर अन् खाली
जरा क्षितिजा लवंडावी ...
तुला मी साद घालू का
तुला उमजेल हे सारे
तुला स्मरण्यात केवळ
का इथे ही रात्र रंगावी ?
जुने काही नवे काही
उखाणे तूच घालावे
तुझ्या माझ्यातली कूटे
क्षणी एकाच भंगावी ...
असे जगणे असे झुरणे
कितीदा अन् रिते उरणे
तुझ्या माझ्यातली दुनिया
अता फिरूनी अभंगावी ...
No comments:
Post a Comment