Saturday, October 27

रूजतात गाणी ...

सांगता मी कथा अपुली तिची होते विराणी 
दोष माझा तुझा होतो कसा हा सांग राणी ?

हाय दुनियेस या चढते नशा दुःखात माझ्या
झिंगते ती कशी येता जरा डोळ्यात पाणी !

टाकुनि जे मला गेले कधी येती छळाया 
मांडला खेळ का सोडून हा जाते कोणी ?

रात्र ही काजळी केव्हातरी संपेल आता
बोलते ही हवा का सांगते ती रातराणी ?

भासते ही जशी क्षितिजावरी रेषा एक
जीवनाची कथा लिहिते कुणी एकाच पानी

सूर साधू किती सांधू किती शब्दांस आता
श्वास घेता अता जगण्यातुनी रूजतात गाणी

1 comment:

srujana said...

Win Exciting and Cool Prizes Everyday @ www.2vin.com, Everyone can win by answering simple questions. Earn points for referring your friends and exchange your points for cool gifts.