Thursday, October 18

बरे नाही !भेटणे माझे तुला हे खरे नाही 
राहणे भेटी विना ही बरे नाही !

माळतो माझे तुला जे गीत मी 
पाखरांना सांगणे तू बरे नाही !

चांदण्याचे झाड दारी भारलेले 
आसवांना वेचणे तू बरे नाही !

आज वारा सांगतो काही मला 
सांगणे काळ्या दिशेचे खरे नाही

हे तुझे माझे कसे नाते खरे ? 
वाटते सारे बरे पण खरे नाही !

No comments: