Sunday, September 30

तुझे गाणे ...

माझे गाणे वेडे ओले बिंब
तुझे गाणे येते बरसुन चिंब

माझे गाणे होई एक मृदंग
तूझे गाणे घेई सघनघन रंग

माझ्या गाण्याला चढते भूल
तुझे गाणे तर ऐन वसंती झूल

माझे गाणे शोधीत जाते तारा
तुझे गाणे घुमवी गगन-गाभारा

माझे गाणे वेडी गाते धून
तुझे गाणे वारा रूणुझुणू बीन

माझे गाणे माझा एकल श्वास
तुझे गाणे हा जन्मांचा प्रवास !

No comments: