Sunday, September 23

चमत्कार

दर महिन्याला एक
असं हे औषध...
त्याला म्हणायचं 
सणवार !
पावसाळ्यात जरा जास्त घेतात 
त्याला म्हणायचं 
चातुर्मास !
खूप जणांनी 
एकत्र प्राशन करायचं 
मस्त व्हायचं 
धुंद व्हायचं 
मज्जेत जगायचं 
सगळे त्रास विसरून 
फक्त हसा-नाचायचं 
धर्म नावाची लैबोरेट्री
त्यात बनलेली औषधं 
अफिमी .. गुंग, धुंद करणारी !
सणवार ..
समाजाला नशा !
बेकारी, बेरोजगारी, विघटन, 
महागाई, अस्थिरता, भ्रष्टाचार
असं काहीही नसल्यागत
फक्त एक 
सार्वत्रिक युफोरिया !!

जागी राहिली तर त्रास देतात
लहानग्यांना म्हणून अफू पाजण्याची 
एक परंपरा होती ना 
याच देशात ??

एका दिवसात वर्तमानपत्राची पानं 
फुलून गेलेली उत्साही रंगानी 
काहीच वाईट घडत नसावं आजूबाजूला
असा एक जादुई अनुभव
या पानांमध्ये सर्वत्र !!

का 
हा त्या सणाच्या अधिपतीचा 
कलियुगातील चमत्कार ??

2 comments:

Milind Phanse said...

विचार साम्यवादी अंगाने जाणारे असले तरी कविता निश्चितच प्रभावी आहे. परंतु मला असे वाटते की 'धर्म ही अफूची गोळी आहे', 'भ्रष्टाचाराचा राक्षस मातला असताना सण साजरे होताहेत' ही हमखास टाळीची वाक्ये धर्म व धार्मिक उत्सव मानवाची कोणती तरी खोल आंतरिक, भावनिक गरज भागवतात ह्या वैश्विक व सार्वकालिक सत्याकडे जाणूनबुजून म्हणा, अनवधानाने म्हणा, दुर्लक्ष करतात. सण-उत्सव साजरे करण्याच्या रीतींत शिरलेल्या अपप्रवृत्ती निपटून काढायला हव्या ह्याविषयी दुमत नाही, पण म्हणून सरसकट सामान्यीकरण कितपत योग्य आहे? इंग्रजीत म्हण आहे ना, "Do not throw the baby out with the bath-water."

Unknown said...

MILIND,

Waachli comment. Eka levelvar he patatach manaala.. pan saamyawaadapeksha Maajha focus "tya tashya vidhananchya" vyapak pratibimbawar aahe. Je prominently aani prakarshane disat aahe tyawar jaastt aahe. Media cha tyaala sahabhag hi mala nondawawasa waatatoy. I am noticing, notifying the change, with amplified senses. Not condemning celebration per say