Friday, August 10

पाय

नात्याचा चिखल होतो
तेव्हा त्यातून पाय
सोडवून पळणं शक्य असलं
तरी पुढच्या वाटेवर त्याच चिखलाचे ठसे
उमटतातच ..
म्हणून आणखी थोडं थांबावं ...
नात्यातला सगळा ओलावा संपला
की पावलं होतात सुटीसुटी
चिखलाच्या जागी
उरते आता
फक्त त्या नात्यामधे ओल न टिकवू शकलेल्या
अपेशी क्षणांची राखुंडी
कोरडी ठाक
जी धरून ठेवू शकत नाही काहीही
आपला पाय
चटकन् निघतो
--
Pradeep Vaiddya
Pune, India.


Love Trees ! Love Poems !! LOVE LIFE !!!

No comments: