Saturday, August 11

आदिम ..


आकाशातून ताऱ्यांचा प्रकाश
आपल्यापर्यंत सहज येतो
समोर बसलेल्या माणसापासून मात्र 
तो आपल्यापर्यंत येऊ शकत नाही
माणसा माणसांमध्ये
जो आदिम काळोख भरून राहिलेला असतो, आहे
त्याला छेडणारा प्रकाश 
सापडावा लागतो ..
आपल्याच हृदयात !

1 comment: