Friday, August 10

पावसानंतर

रात्रभर
मी जागवलेला पाऊस
आत्ता विश्रांतीला गेलेला...
आणि
सकाळी अंगणामधे तू
केस वाळवताना
कालचे केसात माळलेले स्पर्श
हळूवार झटकत....
आणि
एक दबकं लाजट ऊन्ह
तुझ्या गालांवर !


No comments: