Wednesday, August 8

निष्फळ

निष्फळ बेरजा वजाबाक्यांमधे
आपण सततच ज्याला
गुरफटवून टाकत बसतो
ते आपलं आयुष्य
गमावून बसायला
पुरा पडतो
केवळ
एक निमिषमात्र
आणि नेमका हा एकच क्षण
आपल्या हातात नसतो
म्हणून सारे हिशेब झाल्यावरही
खाली उरते निष्फलताच !
अशी केवळ एका निमिषमात्रावर
तोललेली आपापली आयुष्यं घेऊन
आपण एकमेकांमधे मिळतो
वजा होतो, गुणले जातो 

विभाजन पावतो

पण 

कोणाचाच हा हिशेब काही
जुळत नाही
म्हणून तगमग़तो
हे विसरायला झगमगतो
कधी
सोबत जायला डगमगतो
आपण सगळेच
होऊन बसतो
गणिताच्या चकव्यामधले
गरगर भोवरे
भोवळणं हेच आयुष्य म्हणून
घेऊन फिरणारे
त्या एका निमिषमात्राचा हिशेब
न लागल्याने बेहिशेब
गरगरणारी एक वसाहत
आपण ! 

No comments: