आदर्श हे नांव
प्रकल्पास द्यावे
घोटाळे योजावे
त्यात सारे ||
राष्ट्राच्या घोषणा
पक्षाला असाव्या
स्थानिक कराव्या
उचापती ||
मंदीर बांधावे
प्रिय दैवताचे
तिकीट लाखांचे
प्रवेशास ||
विद्यालय जंगी
त्वरे उघडून
प्रवेश म्हणून
पैसा पिके ||
संस्कृतीची माय
नदीला म्हणावे
खुशाल हगावे
तिच्यामध्ये ||
शुभेच्छांच्या पाट्या
नेत्याच्या लावून
स्वतःची त्यातून
जाहिरात ||
नाव एक घेणे
कार्य दुसरेचि
हीच या युगाची
वस्तुस्थिती ||
शेक्सपियरा बापा
बोललासि सत्य
नांवामध्ये तथ्य
नाही जरा ||
1 comment:
अगदी वस्तुस्थिती रेखाटलीत.
अतिशय सुरेख आशय आहे आणि मांडणीसुद्धा.
Post a Comment