Monday, July 9

नाही पाऊस आला ...

नाही आजही पाऊस आला

अता तर डोळ्यातला संपला

ओलावा ।।


स्वप्नांची पिके किती घेतली होती ?

समजूत काढली आणि मनाची खोटी

वादळवारा नुसता येऊन  उडवी पातेरा


नाही आजही पाऊस आला ...


उन्हे नव्हे ही छाया दुष्काळाची

धडपड तडफड जळत्या शुष्क जिवांची ...

चित्र काजळी जुळते विरते झुरत्या आभाळा 


नाही आजही पाऊस आला ....


निष्फळ वांझ मनधरणी आभाळाची

मरून चालली नाती अन् मातीची

संपत नाही काळ जाळ हा झळता उन्हाळा


नाही आजही पाऊस आला .... 

No comments: