Monday, July 9

निघताना

निघतानाचे डोळे पाण्याचे तुझे

अडखळणे मी वळताना अन् पायांचे 

....
माझ्यामागे सोसत नसता धावत येणे

ऊर धपापत हसणे - ढळणे पदराचे 

....

रात्र तुझ्या डोळ्यात आपली लालवती

स्पर्श घुटमळे - अर्थ उकलण्या नात्याचे 

.... 

भेटू पुन्हा म्हणणे तुझे डोळे मिटुनी

जाऊ नको हा अर्थ अंतरी धरण्याचे 

No comments: