Friday, July 6

सतत

माझ्या
नकळतही  
सतत
काही
सरते आहे

मी निपचित पडतादेखील
काहीतरी
सरकतेच आहे


मी पाहिले नाही तरी
काही
येते जाते आहे

एकसंथ - एकसंध
लयीमधे - लयीशिवाय
काहीबाही
क्रमाक्रमाने
अविरत
अबोल
घडतेच आहे

टिकटिक यंत्रामधे
घसरत चालल्या वाळूमध्ये
पकडू पाहाता
सटकत जाते
येते जाते
जात राहाते

असे काही
काहीबाही !

आत आत
बाहेर बाहेर

आत बाहेर

सरळ सरळ
गोल गोल

सतत सतत !!

No comments: