Thursday, June 21

अस्ताई

अस्ताच्या वेळी वाटे
का इथे असा उरलेला
हा एक दिवा विझणारा
हृदयाशी मिणमिणणारा ?

अस्ताच्या वेळी माझा
होतो अन रोजच अस्त
तिमिराच्या दुलईसाठी
मी रोजच आतुरलेला !

अस्ताच्या वेळेसाठी
कुणी घेतो रोजच जन्म
हे डोळे मिटण्यासाठी
हा जन्मच आसुसलेला ||

अस्ताला जाते बिंब
मी तसाच येथे उरतो
मी प्राण शोधतो येथे
सावलीसवे सरलेला ||

अस्ताच्या वेळी माझे
अस्ताला जाणे यावे
अस्ताई संपून गाणे
अंतरा म्हणू लागावे ||

3 comments:

rajendra chavan said...

किती सुंदर आहे..
मी प्राण शोधतो येथे सावलीसवे सरलेला.

Mohana Prabhudesai Joglekar said...

Kavita Awadali.

Unknown said...

Astachi mast kavita!