Monday, June 25

पुन्हा ...

जेव्हा माणसं तुटून दूर जातात
तेव्हा त्यांच्या सहवासाचे सर्व क्षण विरून
पार नष्ट होतात
तो सगळा भूतकाऴच नाहीसा होतो ...
आणि नाही राहात शिल्लक
त्या भूतकाळातून उमलू पाहाणारा भविष्यकाळही !
मग ती माणसं नसलेल्या शक्यता हाती
उरलेले आपण
समोरच्या आगंतुक पोकळीत 
संपूर्ण नवा काळ रंगवत बसतो ...
पूर्णपणे नवीन चित्र मनात आकार
धरू लागण्याची अपेक्षा आणि भीती
इतक्याच भांडवलावर 
त्या अजस्र पोकळीशी दावा मांडून 
पुन्हा उभं राहू पाहातो आपण ! 

1 comment:

aativas said...

हं .. पुन्हपुन्हा असं होत राहत हे खरच आहे!!