Friday, June 8

पीक

पाऊस येतो
आभाळभर पाऊस
आणि
त्याची वाट पाहात्या
रेघांच्या मखराने मढलेल्या, माखलेल्या
भाळांवर घामाची जागा घेतो
तेव्हा
काही नव्या निरर्थ शक्यतांचं एक
पीक त्या खाली डोळ्यांमधे
चमकत उभं राहातं
आशा संपून वठलेल्या
डोळ्यांवर पालवी तरारते
भविष्यातल्या मोजक्या क्षणांच्या अस्तित्वाची फक्त.

No comments: