Thursday, May 31

खडकवासला


या जलाशयात अजूनही बरंच पाणी दिसत आहे ...
पण पलीकडच्या टेकड्यांना भेदून पुढे पुढे सरकत
आकाशाला गवसणी घालणारं ते शहर ...
त्याची वखवख काही दिवसातच हे उरलं सुरलं पाणी फस्त करील ...
ही धरणाची भिंत 
इथं आलं की कळतंय की या शहराने
गेल्या पावसानंतर किती पाणी फस्त केलंय ...
उन्ह तापतंच आहे
या जलाशयाच्या तळापाशी 
गाडली गेलेली गावं पाहाण्याचा 
चंग सूर्यानं बांधला असल्यागत तो पाणी शोषत सुटला आहे

जमिनी हरवून स्थानभ्रष्ट झालेल्यांचे खारट अश्रू
या खालच्या जमिनीत कष्टकरी माणसांचा निथळलेला घाम
त्यांचे हरवलेले आनंद, दुःख आणि त्यांचा इतिहास
हे शहर वर्षानुवर्ष पीत सुटलं आहे ...

हे काही अवशेष ...
इथे पन्नास एक वर्षांपूर्वी सुखानं नांदत होती अश्या संस्कृतीचे 
पलीकडे शहरी संस्कृतीने शोषून घेतलंय आता त्यातलं
''जीवन'' !

2 comments:

Ram said...

एकेकाळी या धरणानं शहर गिळलं होतं
आता हे शहर धरणाला गिळून बदला घेतंय.

The Wanderer said...

How true ! Very well said as well.