Wednesday, May 30

विचार चालू काम बंद !

खूप दिवसात 
बंद झालेला नाही
एखादा 
अगदी 
happening बंद !

कालच कुठेतरी वाचलं 
"हिंदुस्तान बंद"
आधी वाटलं 
हिंदुस्तान बेकरी आता बंद करतायत की काय 
निम्म्या पुण्याच्या रविवार सकाळच्या ब्रेक्फाष्टचं  आता काय होणार
अश्या प्रश्नात असताना लक्षात आलं 
भारताला काही पक्ष हिंदुस्तान म्हणतात तसं ते आहे ..

आशा पालवल्या 
अरे वा .. कोणीतरी हाक दिलेली आहे
बंदची हाक !
पेट्रोलच्या भाववाढीविरुद्ध !!
गरज तर आहेच ...

पण 
पेट्रोल काही कमी होईल असं वाटत नाही ...
मग आता एकच गोष्ट इन्टरेस्टिंग ..
बंद तरी जोरात चालतो का ते पाहू ...

पण अलीकडे बंद तितके जोरात चालत नाहीत
बहुधा 
नंतर compensatory काम करायला लावतात सगळीकडेच म्हणून !

No comments: