Monday, June 4

छुपे प्रेमवीर !


लपत छपत प्रेम
लपून छपून प्रेम 
कुढून कुथून प्रेम
जगतो आम्ही ||

दुरून झुरून प्रेम
विझून थिजून प्रेम
मूग गिळून प्रेम
बघतो आम्ही ||

थकून दमून प्रेम
जपून मापून प्रेम
पडत झडत प्रेम
धरतो आम्ही ||

इतर बितर प्रेम
सटर-फटर प्रेम
अघळ पघळ प्रेम
जगतो आम्ही ||

आम्ही झुर-झुरतो
आम्ही मर-मरतो
आम्ही फरफटतो 
पण ... प्रेम ?
प्रेमाकडे हे असंच 
बघत बघत
टुकत टुकत
हुकत हुकत 
मरतो आम्ही || 
 


No comments: