Wednesday, May 30

आजचं राशीभविष्य !

१ - मनःस्ताप संभवतो
२ - दुसरे समजून घेणार नाहीत
३ - निरुत्साह वाटेल
४ - पैसे पुरणार नाहीत 
५ - कौटुंबिक चिंता
६ - वरिष्ठ त्रास देतील
७ - कामात विलंब होईल
८ - शत्रूंची ताकद वाढेल
९ - वादविवाद टाळा
१० - चिडचीड होईल 
११ -  अपघातापासून सावध राहा
१२ - प्रकृती सांभाळा
असं आपलं 
एक डझन वाक्यांचं वर्तमान ...
एक दाढीवाला 
भविष्य म्हणून 
दिवसभर सांगणार आहे
आपण तेच तेच रोज पाहाणार आहोत
रोज यातलंच एखादं वाक्य
ग्रहांची कारणं चिकटवून
तो चघळणार आहे
आणि 
आपल्या भविष्याने 
एक तरी बरी शक्यता आपल्यावर 
थुंकावी  म्हणून आपण
आशाळभूतपणे
आजचं राशीभविष्य
पुन्हा पुन्हा 
पाहाणार आहोत !

1 comment:

rajendra chavan said...

हे खूप छान लिहितोयस तू...म्हणजे चिखलात रुतलेल्यांना
चिखलाची जाणीव करून देणारं!