Wednesday, April 25

मी जाईन ...

जाईन असा मी
वाटेवर एकाकी 
तुझ्याकडे ऋण 
नसेल माझे बाकी ||

तुझे नि माझे
तिन्ही काळांचे
नसेल ओझे
की जन्मांचे 
उरेल माझ्या 
पायांखाली
वाटेवरची
शुभ्र लकाकी ||

परतुनी जाईन
पुन्हा न येईन
येणे जाणे अन
ओलांडून
कालौघाचा प्रवाह
मी अन
चमकत पैल तटाकी ||

1 comment:

Milind Phanse said...

छान. कविता आवडली.