Tuesday, April 10

आई ...

आईचे असतो आपण
आईने असतो आपण 
आईने नसतानाही
आईचे असणे आपण !
आईची हाक मनात
हुरहुरती स्मृती हृदयात
आईच्या स्पर्शाखाली
ते अनाथ डोके आपण !
ती उमजत नाही आई
ती आई समजत नाही
अश्रूंचे ओले जगणे
आईने पुसतो आपण !
आईचे दुःखच आपण
अन तिच्या स्मितातून आपण
जन्माचा गर्भ म्हणून
काळाच्या पोटी आपण !
आईचे होता यावे
आईही होता यावे
आईला मिळता यावे
का म्हणून जगतो आपण ?

2 comments:

rajendra chavan said...

आई गं!

Adi said...

उत्तम... उत्तम... उत्तम...