Wednesday, April 4

जन्म - ऋतू

पावसा तुला
गहिवर माझे
दुःख दाटून
फाटण्याचे !

बरसते हे
अथांग वरती
भोगलेले
अतीत माझे !

सैर-भैर
तुफान वेडे
सांत्वनांचे
सणंग वारे !

किर्रकाटी
किचाट किच्च
कल्कला आर्त
मनातुनी वाजे !

जाळणारे
विजाळते शाप
प्राक्तनाचे
भ्रमिष्ट देखावे !

जन्म काळा
ऋतू असा ओला
कर्दमाचे
जिवंत ओझे !


----------
Sent from my Nokia phone

2 comments:

सुप्रिया.... said...

जाळणारे
विजाळते शाप
प्राक्तनाचे
भ्रमिष्ट देखावे !

Mastch ahe kavita :)

Chetan Dange said...

kamaal ahe.