आईच्या डोळ्यांमधली
घन-गर्द, मार्दवी,
घन-रेशीम, गूढशी,
काजळ माया
सरताना
मी बघत राहिलो ...
निस्तेज सांत्वनाचे तिचे (का आणखी कोणाचे?)
बधीर हात फिरत राहातील आता
नुसतेच माझ्या पाठीवर
नुसतेच ...
अर्थहीन ...
जादू संपलेले ...
कारण आता
आईच्या स्पर्शातले
ते मोरपीसही मालवले आहे !
(कवीवर्य ग्रेस आता नाहीत हे एक नाटक-दौरा संपवून येताना कळलं तेव्हा बसमधे लगेच सुचलेलं काही ... इथे आई म्हणजे अर्थातच मराठी भाषा )
1 comment:
कविवर्य ग्रेस गेले खरे पण मराठी भाषेला एक वेगळीच ग्रेस देऊन गेले....
Post a Comment