असतो
त्या त्या वेळेचा ...
ते माणूस कायमचं नसतं पहिलं !
पण
त्या दिवशी, त्या वेळी
त्याने दाखवलेली चुणूक
उत्तमतेची जाणीव
त्यातलं नस पकडण्याचं कसब
मनं जिंकण्याची ढब
उणीवा झाकण्याची शक्कल
आणि
झळाळी कमावण्याची अक्कल
ह्यांचं त्याला जमलेलं रसायन
अव्वल असतं
त्या दिवशी ... त्या वेळी !
खरंतर
एखादा कलाकार
कलेच्या निर्मितीचा क्षणी
कायमच असतो अग्रणी !
त्याची स्पर्धा असते ती
फक्त त्याच्या हातातून
सटकत जात असलेल्या
एकेका क्षणाशी !
सटकत चाललेल्या काळाचा
लगाम जो मिळवतो
अव्वल ठरत जातो
त्या दिवशी ... त्या वेळी !
पहिलं, दुसरं
तात्पुरतं
भूतकाळात जाणारं ...
खरा क्षण तो निर्मितीचा ...
निर्मितीच्या वर्तमानकाळाचा !
त्या क्षणाशी सतत स्पर्धा
कलाकाराची !
कलाकार सरला तरी
क्षण मात्र उरतात
नव्या नव्या कलाकारांना आव्हान देत !
2 comments:
किती प्रामाणिक,
खरं
आणि
लक्षात ठेवावं असं!
सुंदर ज्यांनी असा अनुभव घेतला आहे त्यांना अगदी पटणारं.
Post a Comment