Wednesday, February 22

कला आणि सत्यत्व

दगडाचा देव 
एखाद्यानं केला 
भेटो जाता त्याला
टणकचि !

मातीत पुतळा
देवा आकारले
अंती साकारले
ठिसूळत्व !

लाकडी ईश्वर 
कामाचा तो काय ?
आगीमध्ये जाय
जळोनी की !

वाळूमध्ये किल्ला
बालकाने केला
वाखाणता गेला 
लाटेमध्ये !

कला कलेजागी
ठेव कलाकारा
त्यात नाही थारा 
सत्यत्वाला !

No comments: