Monday, February 20

पुतळा

आपण ज्यांच्यावर प्रेम करतो 
त्यांना आपल्या प्रेमाचीच 
जेव्हा अडचण होऊ लागते
तेव्हा प्रेम करायचं कसं थांबावं ?
हे मला कळत नाही ...
मग ...
प्रेम व्यक्त करणं थांबवावं लागतं ...
अश्या आपल्या माणसांसमोर मग 
मी होऊन जातो 
एक पुतळा ...
मनामध्ये अनावर प्रेमाने तुडुंब ...
पण चेहरा मात्र निर्विकार !

No comments: