Monday, February 13

शक्यता


कोणीही नसताना
एकाकी
मात्र मी
असताना
येशील ?
तेव्हा नसतील
माझे हर्ष आणि उन्माद
नसतील
वारे आणि तारे
नसतील हास्य किंवा 
दुःखाचे उमाळे !
नसेल काहीही
आपल्यामध्ये
अडणारे
खुपणारे
सलणारे 
माझे 
तुझे
असे काहीही !
तेव्हा ये ...
समोर बस अश्या एका वेळी !
तेव्हाच काही 
शक्यता 
या जन्माचे
आपले
उरले-सुरले सारे
हिशेब
मिटण्याची !


No comments: