Monday, February 13

अनोळखी

खुणावणे तुझे असे
अनोळखी !
तुझ्यामुळे शहारणे
अनोळखी !!

पसंत-नापसंत बोलणे 
तुझे 
पुन्हा फिरून ऐकणे
अनोळखी !!

मनात वाजती खुणा
दुरावता
दुरावणे, न साहणे
अनोळखी !!

तुझेच नाव ओठ हालता
फुटे 
अबोल साद ही मला
अनोळखी !!

फिरून जन्म हा जणू 
तुझ्यामुळे 
तुझ्यामुळे मलाच मी
अनोळखी !!

No comments: