Sunday, February 12

फांदी

माझी कविता 
हलकेच 
कधी येईल 
तुझ्याकडे
तेव्हा इतकंच असू दे लक्षात 
की
नकोय तिला 
तुझा गांव
किंवा नको 
तुझ्या मनाचा ठाव
तुझ्या 
अंगणातल्या झाडाची 
एक फांदी पुरे 
घटकाभर 
बसेल ती तिथे 
आणि 
भुर्रर्र् दिशी 
उडून जाईल !

No comments: