Monday, February 6

काव्य-कळा

स्वार्थ दंभ लोभे
जग हे भरले
कवित्व इथले
फुका जाय ||

शिकार साधती 
पशू येथ नित्य 
काव्य ऊर्मी मिथ्य
मानवाची ||

उदर-भरण 
लिंगांचे शमन
आणखी जीवन
नाही काही ||

कविता कशाशी
कशी खावयाची ?
काय कवितेची
नड कोणा ||

साहित्य कशाला ?
कशास वाङ्मय 
पैशामागे पाय
धावताना ||

मारो मायबाप 
भाषेला मरू द्या
तशी ती जगाया 
लागे कोठे ?

जन्म अन् मरण
भोग अन् वासना
काव्य-कळा कोणा?
हवी त्यात ||

कवी अन् कवित्व
राहो दृष्टीआड
जगणेच द्वाड
झाले सारे ||  

2 comments:

Milind Phanse said...

प्रदीप,
कविता आवडली, भावना पोहोचल्या.

rajendra chavan said...

कितीही सांगून कळणारच नसेल
तर काय ?