माझ्याच असंख्य उध्वस्त दुनियांच्या
अवशेषांमधून
आज अचानक
तुझी हाक आली
एक फक्त अस्फुट स्वर
चिणला गेलेला ...
मी तुला शोधू लागतो ...
अश्याच काही आणखी
अस्फुट चिणल्या स्वरांनी
आता मला वेढलेलं असतं ...
एक अनामिक आवेग
संचारलेला मी
माझा भूतकाळ उकरत
शेवटी पाहातो
की
त्या अवशेषांखाली
कोणीच नाही ...
तू ही नाही !
तिथून ऐकू येणार्या
त्या एकेका दबक्या हाकेमागे
ते ते माणूसच नाही !
आता नुसत्याच हाकांचं
एक रेताड वादळ
माझ्या डोक्यात घुसू पाहातं ...
माझा भूतकाळ हे एक
कब्रस्तान आहे ...
माझ्याच माणसांनी मला
मारलेल्या असंख्य हाकांचं
पुढे पुढे जाण्याच्या नादात मला
ऐकूच न आलेल्या
असंख्य हाका
चिणल्या गेलेल्या !
3 comments:
ताजी माहिती
अवश्य वाचा ः
मराठी रंगभूमीच्या तीस रात्री
लेखक ः मकरंद साठे
अलीकडच्या दीडशे वर्षांच्या रंगभूमीच्या इतिहासाचा संवादरुपाने घेतलेला वेध. नाटकवाल्यांसाठी संग्राह्य.
- केदार पाटणकर
कसली वेदना आहे रे!
या हाकांचं करायचं काय?
आपण मारलेल्या हाका
अशाच कुणाला ऐकू येतील..
त्यांचं काय?
ते आवाज
हाच ‘ऐवज’ समजुया?
किंवा हाका न मारता ..
गाणी म्हणूया!
Baapu, I always feel he asach hot asel naa lokaannaa ?
Post a Comment