Sunday, December 11

पुनर्नव

ठरलेली सुरावट असतेच
आणि 
ती न नाकारताना
मुद्दाम योजलेला एखादा 
आगळा सूर 
तिच्यात वेगळीच खुमारी आणतो 
त्या सुराच्या स्पर्शाने 
थिजत चाललेली एक सुरावट 
पुनर्नव अहल्येच्या  
चेतनेने भारली जाते !

तू मला 
आणखी मी तुला
असू असेच ...

केवळ अस्तित्वामुळे एकमेकासाठी 
चेतनामय ! 

No comments: