Sunday, December 11

नवा शिमगा !

मुंबईचं 
सिंगापूर करायचं ठरलं
तेव्हा ...
ज्यांच्या दिवाळीचा
पार शिमगा होऊन बसला
त्या कष्टकर्‍यांच्या 
जिवंत चिणल्या गेल्याच्या
जागीच
उभ्या केल्या गेल्या 
उंच उंच 
टोलेजंग कबरी ...
कष्टकर्‍यांनी कमावलेल्या या शहराचं 
हे चमचमतं नवीन कोरं 
कब्रस्तान !
सिंगापूर नाही 
तरी 
एक शिमगापूर ! 
आता या शिमगापुराचं 
आणखी काही करायचं 
कुणाच्या मनात येईल 
तेव्हा ... ?

त्या नव्या शिमग्यातून
या शिमग्यातलं
काय काय राहील 
शिल्लक ?

No comments: