Sunday, December 11

अंध

''दुसरा माणूसही आहे''
हे दिसण्या-बघण्याची शक्ती 
गमावून बसलेल्या 
अपंग माणसांचा 
समाज !
त्याचं मन 
भयंकर हिंसेला 
सुप्तपणे पाळत 
पोसतंय ...
याचीही जाणीव 
नसलेला !
शुद्ध हरपावी 
तसं 
मानवता नावाचं 
भान 
खिळखिळं 
होऊन गेलंय पार !
ह्या समाजाला 
उरला आहे
आता
फक्त एक
अंध निर्मम 
पशुत्वमय
भविष्यकाळ !!

No comments: