Friday, December 2

आयुष्य - ३ कविता


आयुष्य . . .
थडथड पिंजऱ्यात
बंद 
एक गुबगुबीत श्वापद !

आयुष्य . . . 
लाल-गुलाबी लोभस 
चिखलामधले 
खोल 
'मी' पण !

आयुष्य . . . 
एक
सततचे 
निरर्थ
अटळ
उरलेपण !


आपण कोण कुणाचे ठरतो 
किंवा
येते का उरता आपल्याला कुणाचे कुणी ?
अथवा काहीही ?
की आपण 
पोसत असतो आपल्या उराच्या पिंजऱ्यात 
थडथडणाऱ्या वास्तवाच्या भासांमध्ये 
आपल्या असंख्य माना वर काढत
लडबडणारा एक लालसी-स्वप्नांचा Dragon 
स्वतःच्या जागी ?


काळे पाणी 
एकच गुंफा 
खोल खोल
पावले टाका
पावलो-पावली
खाली खाली 
जायचं जायचं 
चपक पचक
चपा चपा 
कोण उचले ?
पाउल पाऊल
कोण असते 
कळे कुणा?
काळे पाणी 
शार शार
तळापाशी 
श्वासच गार !


No comments: