Saturday, November 26

किती ... किती ?

चोरणारा 
एक हात पकडला जातो 
तेव्हा प्रकट न होणारे 
चोरांचे हात 
किती राहून जातात तसेच?
 
अन्यायाविरूद्ध एक हात उगारला जातो 
तेव्हा 
किती हातांनी रोखलेलं असतं स्वत:ला 
उगारलं जाण्यापासून ?
 
प्रतिक्रीया दिल्यामुळे 
एखादा 
जेव्हा माथेफिरू ठरवला जातो तेव्हा 
किती असतात प्रतिक्रीयाच न देता आल्याने 
माथेफिरू होऊन गेलेले ?

एक नेता 
जेव्हा त्याचा फुगलेला गाल पुसून टाकत असतो 
तेव्हा 
किती जगण्यांवर 
बोळे 
फिरुन गेलेले असतात ?

1 comment:

aativas said...

भ्रष्टाचार की हिंसा? - हा प्रश्नच किती अपरिहार्यता दाखवतो आपल्या सामाजिक जगण्याची!