Thursday, November 24

देव आणि भक्त

दगडाचा देव | करिता करिता |
धर्मचि दगड | झाला की हो ||
पूजनाचे धन | लाटता लाटता |
पुजारी लुटारू | झाला की हो ||
नवस सायास | करिता करिता |
भक्त ही जुगारी | झाला की हो ||
सोन्याचे संचय | पाळता पोसता |
फकिराचा साहू | झाला की हो ||
पिंजरे रांगांना | शुल्क प्रवेशाला |
देव व्यापाराला | लागला की ||
भक्तांची अन भाषा | देण्याघेण्याचीच |
देवचि  दलाल | झाला की हो ||
अश्याचि  धर्माचे | आचरण माजे |
देव आणि भक्त | एकमेका ||

1 comment:

Tveedee said...

कविता आवडली ! म ..स्त !!