Friday, August 26

बाजार

जनांचे केवळ
नवस-सायास
कोणीही प्रयास
करीच ना ||

उपास तापास
कौतुकांचे कोड
खाती गोडधोड
त्याचि मिषे ||

लिलाव पावत्या
सोन्याची कोठारं
देवांचे बाजार
मंदिरांचे ||

भक्तीचा गाभारा
मनामध्ये जागा
नाही कोठे बघा
माणसांत ||

स्वार्थ साधणारा
परमार्थ सारा
अश्या अविचारा
धर्म म्हणे ||

जळोत मंदिरे
देव बुडवावे
माणसाने व्हावे
माणसाचे ||

1 comment:

rajendra chavan said...

देव संकल्पनेत खरं तर फक्त माणूस नाही
तर सर्व सजीव निर्जिव सृष्टीचा विचार असावा
पण
आपण त्या विचाराला मूर्ती करून जखडलं.
आणि हे पुरेसं नव्हतं म्हणून
मंदीरांची कारागृहं तयार करून
त्यात त्या विचारांना बंदिस्त केलं.
विश्वाचा विचार डोक्यात रहावा
म्हणून तर
माणसाच्या पलिकडे पाहण्याची कल्पना निघाली असावी.
‘ओम’चं ‘स्तोम’ झालं
हे मात्रं नक्कीच वाईट झालं.

कविता ‘अभंग’ झालीय!